वेंगुर्ले येथे उद्या १५ मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

डोळे तपासणी, इसिजी : भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले चे आयोजन

⚡वेंगुर्ले ता.१४-:
भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे उद्या १५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग आणि भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. या शिबिरा अंतर्गत महिलांच्या विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.
महिलांना होणाऱ्या अनेक आजारांपैकी गंभीर असलेला कर्करोग जो उपचाराने बरा होतो त्याची माहिती आणि तपासणी. या मध्ये स्तनाचा कर्करोग (स्वस्तन परीक्षण) आवश्यक असल्यास मॅमोग्राफी पूर्णपणे मोफत, सारवायकल कर्करोग तपासणी, डोळ्याची तपासणी, इसीजी तपासणी, तोडाचा कर्करोग तपासणी (तोंडाची तपासणी, आवश्यक असल्यास तोंडाची बायप्सी. त्याच प्रमाणे स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि चिन्ह याबाबत माहिती आणि तपासणी, गर्भाशय मुख कर्करोगाची सामान्य लक्षणे तपासणी या सह महिलांना उद्भवणाऱ्या आजारांची तपासणी यावेळी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी महिलांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७४९९०४९५६१, ७४९९६९१७०५ यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page