⚡वेंगुर्ला ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशाधेन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सभेमध्ये संघटना बांधणीबरोबरच कॅनिग, वाढत्या तापमानामुळे व विषम हवामानामुळे आंबा पीक धोक्यात आले असून आंबा - काजू बागायतदार आर्थिक संघटात सापडला आहहे. त्यावर चर्चा तसेच १५ मार्च नंतर विमा, बोगस औषधे, कीटकनाशके, ५० टक्के अनुदानावरील कीटकनाशके, कर्जमाफी आदींवर चर्चा होणार आहे.
