Headlines

सावंतवाडी तालुक्यातील धान्य व केरोसीन विक्रेते तीन दिवस संपावर…

गणपत राणे ; नायब तहसीलदार श्री मुसळे यांना दिले निवेदन… ⚡सावंतवाडी ता.०६-: धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संघटनाने पुकारलेल्या बंदमध्ये उद्यापासून तीन दिवस सावंतवाडी तालुक्यातील धान्य व केरोसीन दुकानदार सहभाग घेणार आहे त्यामुळे तीन दिवस ही दुकाने बंद राहणार आहेत याबाबतची माहिती सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणपत राणे यांनी दिली…

Read More

चिंदर पोसेपाणी येथे 7फेब्रूवारी रोजी डबलबारी भजनाचा सामना

⚡मालवण ता.०६-: श्री देव गवळदेव व श्री निरंकारी ब्राम्हण देव चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे मंगळवार सात फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त सकाळी भगवती देवीला,गवळदेव, निरंकारी ब्राम्हण देव अभिषेक, सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा. दुपारी महाप्रसाद, दुपारी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी पाच वाजता चिंदर भटवाडी मंडळाची फुगडी.सायंकाळी सहा वाजता स्थानिक भजने,दीपोत्सव आदी…

Read More

जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

⚡मालवण ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा खिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत मानाचा जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आज आचरा जामडुल येथे आचरा येथील जेरोन फर्नांडिस व चिंदर येथील रुजाय फर्नांडिस यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारप्राप्त फर्नांडिस यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांना मान्यवारांच्या हस्ते…

Read More

नदीपत्रात शिंपले काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

⚡मालवण ता.०६-: चिंदर भगवंतगड येथे पात्रात मुळे काढण्यासाठी उतरलेले त्रिंबक पलीकडची वाडी येथील चंदन भिवा घडीगावंकर वय 55 यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना ही रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे. या प्रौढाचा मृतदेह खाडीपात्रात दिसून आला होता. या घटनेची आचरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.आचरा पोलिसांनी दिलेल्या…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या राक्षसी वृत्तीचा बीमोड आई भराडीनेच केला

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला पलटवार ⚡मालवण ता.०६-: शिवसेना ठाकरे गटाच्या राक्षसी वृत्तीचा बिमोड आई भराडीने केलेलाच आहे. फक्त ते अजुन समजून घेता येत नाही. भराडी मातेने शिवसेना ठाकरे गटाची व्यवस्थित निर्गत लावली असून उरली सुरली निर्गत येणाऱ्या वर्षभरात लागेल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला आहे. आंगणेवाडी येथे भाजपच्या आनंद मेळाव्याच्या…

Read More

आंगणेवाडीतील भाजपचा आनंद मेळावा भाविकांसाठी ठरला “वेदनादायी”

ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची टीका मालवण दि प्रतिनिधीआंगणेवाडी येथे भाजपने घेतलेला आनंद मेळावा हा भाजपासाठी जरी आनंद मेळावा असला तरी जत्रेला येणाऱ्या भाविकांना आणि जनतेला तो वेदनादायी आणि कष्टदायी ठरल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करून आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून भाजपने सर्वसामान्य लोकांना जो त्रास देऊन राक्षसी वृत्तीचे…

Read More

चोरी प्रकरणी एकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील सालईवाडा परिसरात एका घरातून मोबाईल, सोन्याची चेन व व्यायाम करण्याचे लोखंडी डंबेल्स चोरी प्रकरणी काल ताब्यात घेण्यात आलेल्या साजिद ऊर्फ मुन्ना इसाक शेख (रा. बिरोडकर टेम्ब ) याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात कडून देण्यात आली आहे.

Read More

पियाळी येथे ऊस बागायतीला आग; लाखो रुपयांचे नुकसान

⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यातील पियाळी येथे भर दुपारी ऊस बागायती शेतीला आग लागली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलमाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरदुपारी आग लागल्याने व वाराही सुटल्याने आग सर्व माळरानापर्यंत भडकली होती.दरवर्षी पियाळी येथे आग लागून ऊस बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या वर्षीही आग लागल्याने…

Read More

वेंगुर्ले नगर परिषदेचा एक टक्का मालमत्ता हस्तांतरण कर रद्द करा

नरेंद्र गवंडे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन ओरोस ता.06-: वेंगुर्ले नगर परिषद प्रशासन आकारत असलेले १ टक्के मालमत्ता हस्तांतरण शुल्क कायद्याशी विसंगत असल्याने ते तात्काळ रद्द करावे, अशी मागणी वेंगुर्ले सिद्धिविनायक प्लाझा येथील रहिवाशी नरेंद्र भालचंद्र गवंडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, मालमत्ता हस्तांतरण सूचना व हस्तांतरणाची मालमत्ता कर रजिस्टर…

Read More

विमा बांबू लागवड कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा उपक्रम ओरोस ता ६आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रे मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिमा बांबू लागवड मिशनची सुरुवात करण्यात आली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हामध्ये बिमा बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आले आहे. आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आंगणे देवस्थान समितीच्या सदस्यांना मुख्यमंत्री…

Read More
You cannot copy content of this page