३६ जणांचा होणार सन्मान
ओरोस ता.१३-:
जिल्हा परिषद मार्फत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 14 मार्च रोजी पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे चे महिला व बाल विकास अधिकारी सतोष भोसले यांनी दिली आहे. एकूण २६ जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडी स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबाबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श अंगणवाडी सेविका, एक आदर्श मिनी अंगणवाडी सेविका, आणि एक आदर्श मदतनीस असे आठ तालुक्यात 24 जणांना आदर्श पुरस्कार जाहीर केले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातून दोन आदर्श पर्यवेक्षिकाची निवड करण्यात आली आहे. अशा 26 जणांनाआदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार सोहळा मंगळवार 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
