निराधार असलेल्या रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी यांनी कितीही टीका केली तरी जनता भिक घालणार नाही

केसरकर यांच्या टीकेवर बबन राणे यांचे प्रतिउत्तर; सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रवादीचा अस्तित्व काय..?

⚡सावंतवाडी ता.१३-: कुठला आधार नसलेले, निराधार असलेले रूपेश राऊळ व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी किती ही केसरकरांवर टिका केली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता तुम्हाला भिक घालणार नाही, असा पलटवार शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे यांनी आज येथे केला.

पुढे बोलताना राणे यांनी, सावंतवाडीतील जनतेला माहिती आहे, तुमचे समाजासाठी योगदान किती ? आणी किती लोकांचे आज पर्यंत प्रश्न सोडवले ? त्यामुळे उगाच रूपेश राऊळ आणि पुंडलिक दळवी यांनी टिका करून आपली पात्रता दाखवू नये, असा टोला ही त्यांनी यावेळी लगवला. ते सावंतवाडी येथील केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बबन राणें म्हणाले की केसरकर यांनी गेल्या मार्च मध्ये भरगच्च निधी आणला होता. त्यावेळी रूपेश राऊळ यांनी कॉन्ट्रॅक्टरांना कामे देवून टक्केवारी घेतली होती. मात्र, या मार्च मध्ये त्यांना काही मिळत नसल्याने ते सैरभैर झाल्याने ते वायवळ टिका करत आहेत, असा आरोप राणे यांनी केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दळवी यांनी सावंतवाडी तालुक्यात आपले अस्तित्व काय ? तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीत किती सीट आल्या ? याचे आदी आत्मचिंतन करावे. मग केसरकर यांच्यावर टीका करावी असा टोलाही राणें यांनी यावेळी पुंडलिक दळवी यांना लगावला आहे.

You cannot copy content of this page