नंतर केसरकर यांच्या प्रॉपर्टीवर बोला;
अनारोजिन लोबो यांचा रुपेश राऊळ यांना इशारा
⚡सावंतवाडी ता.१३-: भाड्याच्या घरात राहणाऱ्या रुपेश राऊळ यांच्याकडे नवीन फ्लॅट कसा आला? हे आदी जनतेला जाहीर करावे. मग दीपक केसरकर यांच्या प्रॉपर्टीचा बोलावे. रुपेश राऊळ यांची दीपक केसरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. रुपेश राऊळ ‘किस झाड की पत्ती है’ असं बोलत अनोरोजीन लोबो यांनी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांचा समाचार घेतला आहे.
