सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांची मागणी;महिला पडून झाली होती जखमी
⚡सावंतवाडी ता.१३-:* सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड कडून आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिला तोल जाऊन पडली असून तिला हाताला व पायाला दुखापत झाली आहे. या गटारावर फरशा घातल्या नसल्याने ही दुर्घटना घडली असून त्यामुळे तात्काळ त्या गटारांवर फरशा घालण्यात यावे, अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी बांधकाम अभियंता यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.
