⚡कणकवली ता.१३-: वैभववाडी तालुक्यातील
लोरे नं. 2 येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर रावराणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आम.रविंद्र फाटक यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
कणकवली येथे शिवसेना मेळावा प्रसंगी हा प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत जिल्हा प्रमुख संजय आग्रे,संदेश पटेल, उपजिल्हा प्रमुख विश्राम राणे, वैभववाडी तालुका प्रमुख संभाजी रावराणे,माजी सभापती रमेश तावडे,नंदू राणे आदी उपस्थित होते.यावेळी संजय रामचंद्र रावराणे, दिगंबर पांडुरंग रावराणे, श्यामसुंदर भुजंग रावराणे,स्वागत भिकाजी रावराणे, वैभव धोंडू रावराणे,भास्कर चंद्रकांत रावराणे, ओमकार दिगंबर रावराणे, प्रणय प्रवीण रावराणे, चैतन्य भालचंद्र रावराणे, विलास नारायण सुतार व अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
