Headlines

रांगोळी स्पर्धेत समीर चांदरकर प्रथम

विकास वराडकर द्वितीय, तर पार्थ मेस्त्री तृतीय ⚡मालवण ता.२३-: मालवण येथील श्री रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडवा उत्सव व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत कट्टा येथील समीर चांदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विकास वराडकर यांनी द्वितीय आणि पार्थ साईनाथ मेस्त्री या शालेय विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त…

Read More

गाबीत महोत्सव नियोजनासाठी उदयाच्या बैठकीला उपस्थित रहावे

गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२३-: अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,गाबीत समाज महाराष्ट्र,व गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये दांडी येथे गाबीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच्या पुढील नियोजनासाठी शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी सकाळी ठिक 11वाजता संस्कार हॉल धुरीवाडा,मालवण येथे गाबीत…

Read More

प्रा रमाकांत गावडे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार जाहीर

२६ रोजी हरमल गोवा येथे होणार वितरण बांदा/प्रतिनिधीगोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सीताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दिनांक २६ रोजी हरमल-गोवा येथे केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.प्रा. गावडे हे गेली २७ वर्षे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अनेक…

Read More

घोडमांडणी कार्यक्रमाने बांदा पारंपरिक शिमगोत्सवाची सांगता

बांदा दि.23 (प्रतिनिधी)- होऴी पौर्णिमे पासून पंधरा दिवसांनी साजरा होणाऱ्या बांद्याच्या शिमगोत्सवाची पारंपारिक घोडमोडणी कार्यक्रमाने सांगता झाली.सोमवारी बांद्याची रंगपंचंमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानंतर मंगळवारी घोडेमोडणीचा कार्यक्रम झाला.पारंपारिक मार्गाने घोड्यांच्या पाच फेऱ्या झाल्या.ग्रामस्थांनी मार्गात दुतर्फा राहून घोड्यांना प्रसाद अर्पण केला.त्यानंतर बाजारपेठेतील घोडेमोडणी देवस्थान येथे या कार्यक्रमाची सांगता झाली.फोटो – ( बांदा येथिल घोडेमोडणी कार्यक्रम)

Read More

इंडीयन टॅलेंट सर्च परीक्षेत वैभववाडी नंबर १ शाळेचे घवघवीत यश

वैभववाडी प्रतिनिधीइंडियन टॅलेंट सर्च 2023 परीक्षेत वैभवी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर एक शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये उमर आयुष प्रदीप नाळे इयत्ता चौथी राज्यात तिसरा आला आहे. वेदांत विनोद सरकटे इयत्ता चौथी सेंटर दुसरा ओम निलेश शिंदे इयत्ता चौथी सेंटर रॅक पहिला आदित्य पांडुरंग भैराळे इयत्ता चौथी झाला आहे सार्थक…

Read More

इन्सुलीत २६ रोजी मोफत महाआरोग्य शिबीर
रोटरी क्लबचे आयोजन

⚡बांदा ता.२३-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि उत्कर्ष युवक कला-क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी रविवार दिनांक २६ मार्च रोजी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात इन्सुली व पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औषध पुरवठा करण्यात येणार आहे. हे…

Read More

आंबोली कबुलायतदार जमीन प्रश्नी दीपक केसरकरांच्या फसव्या भूमिकेचा उद्धव ठाकरे गटाकडून निषेध

⚡आंबोली,ता.२३-: आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नी दीपक केसरकर फसवणूक करून येथील प्रश्नाचा खेळ मांडला आहे.१३ वर्षे आमदार खोट बोलून इथल्या जमिनीची खरी विल्हेवाट लावण्यासाठी जबाबदार दीपक केसरकर आहेत.यांनी जर वेळीच प्रश्न सोडवला असता तर वनखात्याला शेकडो एकर जमीन गेली नसती.हा प्रश्न रखडवून आपला स्वार्थ साधून इथल्या जमिनी दीपक केसरकर यांनी बळकावल्या आहेत.त्यामुळे हा प्रश्न रखडण्यास केसरकर…

Read More

बांदा-दाणोली मार्गावर रस्त्याला मधोमध भगदाड…

रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक; तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी… ⚡बांदा ता.२३-: बांदा-दाणोली मार्गावर निमजगा प्राथमिक शाळेसमोर रस्त्याला मधोमध भगदाड पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मुंबई, पुण्यातून आंबोली मार्गे गोव्यात जाणारे पर्यटक या रस्त्याचा वापर करत असल्याने या मार्गावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. याठिकाणी नजिकच…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे भाडे मिळणार

अनिल डेगवेकर यांचे उपोषण मागे; महाविकास आघाडीची शिष्टाई ⚡कणकवली ता.२३-: कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे २ वर्षे ९ महिन्याचे तब्बल ३४ लाख २३ हजार ८९४ रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत आहे. गेली ३४ महिने भाडे न मिळाल्याने इमारतीचे मालक अनिल डेगवेकर आर्थिक अडचणीत सापडले असून ही थकीत रक्कम त्वरित मिळावी….

Read More

हिंदू धर्माभिमानी मंडळी आयोजित वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

अत्रेया आचार्य, प्रांजल नार्वेकर, मुग्धा गावडे यांनी मारली बाजी वेंगुर्ले- चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ले यांनी वेंगुर्ले शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले होते .या स्वागत यात्रेमध्ये शेकडो हिंदू धर्माभिमानी मंडळी सहभागी झाली होती. या स्वागत यात्रेनिमित्त तीन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती….

Read More
You cannot copy content of this page