नट वाचनालयाला ३७ पुस्तकांची भेट

वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न

बांदा/प्रतिनिधी
बांदा नट वाचनालायला वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी अच्युत गोडबोले लिखित २५ पुस्तके तसेच नाईक मराठा मंडळाने १२ पुस्तकांचा संच प्रदान केला.
सारस्वत बँकेने प्रायोजित केलेली व शरद अष्टेकर यांनी आपल्या मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेली अच्युत गोडबोले लिखित विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र यासारख्या विविध विषयांवरची वाचनीय व उपयुक्त अशी पाच हजार रूपये किमतीच्या २५ पुस्तकांचा संच नट वाचनालयाला भेट म्हणून दिला.
तसेच नाईक मराठा मंडळ या संस्थेचे संस्थापक (स्व.) गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर ग्रंथसंपदा पुर्नप्रकाशन आणि वितरण सोहळा कुडाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांना गुरूवर्य केळुसकर सरांच्या बारा पुस्तकांचा एक संच ग्रंथालयांना देण्यात आला. अशाच पुस्तकांचा संच नट वाचनालय, बांदा या संस्थेला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विनामूल्य भेट देण्यात आला. त्यांच्या या देणगीबद्दल वाचनालयाच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.
बांदा नट वाचनालयात वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, संचालक निलेश मोरजकर, पत्रकार मंगल कामत, विश्वनाथ नाईक, ग्रंथपाल प्रमिला नाईक – मोरजकर, अभिजित पोरे यांच्या उपस्थितीत पुस्तक संचाचे लोकार्पण करण्यात आले.

You cannot copy content of this page