देवगड काँग्रेसचे पोलिसांना निवेदन
देवगड
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे विधानसभा चितपुर (कर्नाटक)चे उमेदवार मनिकांत राठोड यांच्या वर गुन्हा दाखल करावा .अशी मागणी देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले प्रमाणे श्री राठोड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून कर्नाटकात त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.या धमकी नंतर देशाचे पंतप्रधान व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांचा निषेध ही देवगड काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
या वेळी तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सचिव सजाउद्दीन सोलकर माजी अध्यक्ष उल्हास मणचेकर,सुरेश देवगडकर,तुषार भाबल, रशिद खान,विनायक म्हापसेकर उपस्थित होते.
फोटो-देवगड पोलीस निरीक्षक यांचेकडे निवेदन सादर करताना राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी
