राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा संप्रोषण विधी व कलश प्रतिष्ठापना सोहळा

⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा संप्रोषण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा दि. ९ ते ११ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ राठीवडे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंगळवार दि. ९ मे रोजी सकाळी ८ वा. लिंगेश्वर मंदिर महापूजा, सकाळी १० वा. गांगेश्वर देवालय तरंग देवतांना निरी लावणे, दुपारी २ वा. शिखर कलश प्रदक्षिणा (मिरवणूक) दि. १० मे रोजी सकाळी ७:३० वा. प्रायश्चित्त, सकाळी ८:३० ते दुपारी ०१:३० पर्यंत साडेसतरा खेडयातील देवतांना निमंत्रण देणे, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, जलाधिवास, ब्रह्मादि मंडल, बास्तूमंडल पूजन, अग्निस्थापना, नवग्रह पूजन ग्रहबारसूराण, मुख्यदेवतेसाठी व शिखर कलशासाठी हवन, लघुपूर्णाहुती, दुपारी १:३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, संध्याकाळी ४:३० वा. ह.भ.प. कु. मृणाल मिलिंद गांवकर यांचे सुश्राव्य किर्तन, संध्याकाळी ७ वा. नवनियुक्त सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा विशेष सत्कार स्वयंसेवा संघ, राठीवडे आयोजित लकी ड्रॉ योजना सोडत कार्यक्रम, रात्री १० वा. सुस्वर भजने, दि. ११ मे रोजी सकाळी ८ वा. मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित मंडल देवता पूजन, सकाळी १०: ०२ या मुहूर्तावर श्री. सदगुरू हेमंत मणेरीकर यांचे हस्ते श्री देव गांगेश्वर मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना विधी, तत्वहोम, प्रायश्चित्त होम, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक व सांगता, दु. १२.३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री गांगेश्वर कृपा या विशेषांकाचे प्रकाशन जयराम धुरी यांच्या हस्ते व बाळप्रकाश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत, सायं. ५.३० वा. मुंबई मंडळातील पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांची मनोगते, सायं. ६.३० वा. ह.भ.प. किशोर साळुंखे ठाणे मुंबई यांचे कीर्तन, सायं. ७.३० वा. ह.भ.प. नामदेव तळवडकर ठाणे मुंबई यांचे प्रवचन, सायं. ८.३० वा. आमदार वैभव नाईक यांचा विशेष सत्कार, मान्यवर व माहेरवाशीणी यांचे सत्कार, रात्री १० वा. दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ, राठीवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page