कणकवलीत सेल्फी विथ शौचालय

शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

⚡कणकवली ता.०८-: कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली भाजी मार्केट या ठिकाणी सुरू असलेल्या 86 लाखाच्या स्वच्छतागृहाच्या अंदाजपत्रकात मोठा घोळ केला असता आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केला होता दरम्यान स्वच्छतागृहाच्या ठिकाणी जात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सेल्फी विथ शौचालयचे अनोखे आंदोलन छेडले.


कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुमारे 86 लाखांच्या निधीचे स्वच्छतागृह बांधण्यात येत असून या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी जात माजी विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर यांनी स्वच्छतागृहाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेतली. व सदर काम हे 86 लाखाचे असल्याने येत्या काळात कणकवलीमध्ये हे पर्यटन स्थळ म्हणून समोर येणार असल्याचा उपरोधि टोला देखील त्यांनी माजी सत्ताधाऱ्यांना लगावला. या स्वच्छतागृहाला वापरलेल्या निधीमुळे एका स्क्वेअर फुटला जवळपास 10 हजार 500 रुपयांचा दर होतो. माजी विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी या कामावरून यापूर्वीचा सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तसेच सेल्फी विथ शौचालयच्या माध्यमातून कणकवली शहरवासीयांचे या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधत असल्याचेही सुशांत नाईक यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राजू राठोड, साई कोदे, सुजित जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, तेजस राणे, गौरव हर्णे, महेश कोदे आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page