बागवे हायस्कुलमध्ये दहावी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.०८-: मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे शरद गोवंडे स्मृती दहावी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. मसुरे, माळगाव, बिळवस, महान, देऊळवाडा, चांदेर या पंचक्रोशीतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा ‘ लाभ घेतला.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील नामांकित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा अभ्यास केव्हा व कसा करावा, वेळेचे नियोजन कसे करावे, परीक्षेत कोणत्या चुका टाळाव्यात तसेच प्रत्येक विषयाच्या अभ्यासातील क्लृप्त्या व महत्वाचे घटक याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, अनिता फर्नांडिस, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मेघना जोशी, कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे बर्डे, ज्योती तोरसकर, आर. पी. बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे आदींनी विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका अर्चना कोदे यांनी सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे केले. याप्रसंगी संस्थेचे मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुंबई कमिटीचे सहसेक्रेटरी संजय बागवे, मुंबई कमिटी संस्था सभासद राजन परब, शेखर बागवे, संस्थेचे हितचिंतक फर्नांडिस, भरतगड हायस्कूल नंबर २ चे मुख्याध्यापक एस. आर. कांबळे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दीक्षा देवगडकर, संस्कृती, वैष्णवी आदींनी कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

You cannot copy content of this page