शिवाजी वाचन मंदिरच्या कथाकथन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.०८-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर आयोजित कथाकथन कार्यक्रमास बालवाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात वेदिका लुडबे हिने गौतम बुद्धांच्या जीवनातील दोन गोष्टी छान रंजक सांगितल्या तर दाक्षायणी जुवाटकर या बाल वाचकाने बुद्धांचे जीवन चरित्र गोष्टी रुपात सांगितले. तसेच श्रीधर काळे यांनी गौतम बुद्धांच्या जीवनातील घडलेल्या घटना गोष्टी रुपात सांगितल्या व जातक कथा सांगितल्या.

यावेळी मुलांना पुस्तक भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. मेधा शेवडे यांनी श्रीधर काळे यांना पुस्तक भेट देऊन आभार मानले. इतर उपस्थित मुलांना पुस्तके भेट देऊन त्यांना वाचनासाठी प्रेरणा देण्यात आली. यावेळी वाचन महोत्सवात सहभागी बाल वाचक, पालक व श्रोते उपस्थित होते.

You cannot copy content of this page