पाडलोस रवळनाथचा 10 रोजी वर्धापनदिन

⚡बांदा ता.०८-: पाडलोस रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि. 10 मे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 7 वा. देवतांना स्थान, अभिषेक, विधीवत पूजापाठ, 10.30 वा. सत्यनारायण महापूजा व तीर्तप्रसाद, महाप्रसाद, संध्या. 5 वा. स्थानिकांचे भजन, 7 वा. मुंबईस्थित मालवण येथील बुवा विशाल मसुरकर यांच्या सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

रात्रौ 9 वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रीकसीनयुक्त ‘भेद कुष्मांडाचा महिला टेंबलाईचा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page