Headlines

तनिष्का भोसले शिष्यवृत्ती परीक्षेत
जिल्ह्यात तिसरी

⚡दोडामार्ग ता.१६-: साटेली भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूलची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तनिष्का अशोक भोसले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. ती ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्हयात तिसरी व इंग्रजी माध्यमात जिल्हात प्रथम आली.तिला शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

प्रा. स्वागत केरकर सेट परीक्षा उत्तीर्ण…

⚡बांदा ता.१६-: प्राध्यापक तथा खेमराजचे माजी विद्यार्थी स्वागत केरकर यांनी फिजिक्स सारख्या कठिण विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल बांदा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सिंधुदुर्गातील विद्यार्थी ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होताना दिसतात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी सेट परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या प्रसंगी…

Read More

सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती ही व्यवस्था आहे, आदेश नाही

मुलांची गैरसोय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय आहे:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली भूमिका स्पष्ट ⚡सावंतवाडी ता.१६-: शिक्षक भरतीला उशीर होणार म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून सेवानिवृत्त शिक्षक घेण्याचे धोरण ठरविले आहे. तसा आदेश काढलेला नाही. अडिज लाखापेक्षा जास्त लोकांनी शिक्षक भरतीसाठी आवश्यक परीक्षा दिलेली आहे. त्यातून ३० हजार शिक्षक पदे भरली जाणार आहेत. लवकरच जिल्हा परिषादांकडून जाहिराती प्रसिद्ध…

Read More

…म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यात सुधारणा झाली

सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीवरून शिक्षणमंत्री केसरकर यांचा टोला ⚡सावंतवाडी ता.१६-: उद्धव ठाकरेंनी काल सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांना भेट दिली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुधारणा झाली, असा टोला शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे लगवाला. दरम्यान या आदी उद्धव ठाकरें हे कधीच पदाधिकाऱ्यांना भेटायला वेळ देत नव्हते. परंतु आता आलेली परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे भेट देतात म्हणजे खरच…

Read More

पावसाळा संपेपर्यंत स्टॉल हटवू नका

तहसीलदार यांच्याकडे ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी बाजारपेठेत नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल पावसाळा संपतोपर्यंत हटवू नयेत अशी तोंडी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर व स्टॉल धारकांनी वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांना केली आहे. बुधवारी नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष सत्ताधारी…

Read More

मोती तलावात लाईफगार्ड नियुक्त करा

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१५-: येथील मोती तलावात बुडणाऱ्या लोकांना वाचवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मदत करणारे पथक किंवा कायमस्वरूपी “लाईफगार्ड” नेमण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

Read More

तारकर्लीच्या नमिता गावकर झळकणार ‘वेतोबा’ मालिकेत

⚡मालवण ता.१५-: मालवण तारकर्ली येथील ज्येष्ठ अभिनेत्री सौ. नमिता गावकर या ‘सन मराठी’ या वहिनीवर १७ जुलै पासून सुरु होणाऱ्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत झळकणार आहेत. गेली अनेकवर्षे नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, लघुपट व वेबसिरीज मध्ये अभिनय साकारणाऱ्या नमिता गावकर वेतोबा मालिकेच्या निमित्ताने टीव्ही मालिकेत प्रथमच मोठी भूमिका साकारत आहेत. कोकणातील जागृत देवता…

Read More

महेश मांजरेकर यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.१५-: आदर्श सरपंच म्हणून नावलौकिक मिळविलेले, बॅकवॉटर टुरिझम, मत्स्योद्योग विकास असे विविध उपक्रम राबविणारे हडी गावचे माजी सरपंच महेश मांजरेकर यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. हडी गावच्या विकासाकरिता राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना गावात राबविणे तसेच आपले गाव बॅकवॉटर टूरिझम व माशांची शेती याकरिता विकसीत करण्यासाठी मांजरेकर यांनी प्रयत्न केले….

Read More

ओझर विद्यामंदिरच्या भूमिका कोचरेकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

⚡मालवण ता.१५-: सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. भूमिका सदानंद कोचरेकर हिला गुणवत्ता यादीत स्थान मिळून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. याच वर्षी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) या…

Read More

मालवणात साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याची मोहीम

⚡मालवण ता.१५-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात पाणी साचून डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात आली. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. हेच पाणी डासांना अंडी घालण्यास पोषक ठरते. त्यामुळे पावसाळ्यात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मालवण शहरात डासांची…

Read More
You cannot copy content of this page