⚡सावंतवाडी,ता.१४-: फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 100 तासांच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:30 वाजता जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन फिटनेस योग फाऊंडेशनचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्री. अनिल मेस्त्री – उपाध्यक्ष, फिटनेस योग अकॅडमी, श्री. नारायण सावंत – अध्यक्ष, फिटनेस युवा अकॅडमी, सौ. चैताली गवस – कोषाध्यक्ष, सौ. मृणाली राणे – जिल्हा संघटक, तसेच श्री. काशिनाथ पेडणेकर, श्री. समीर हडकर, सौ. सीमा पई आणि सौ. स्नेहा सबनिस आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर आचार्य बाळकृष्णजी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या 8 दिवशीय शिबिरातील सहभागी योगसाधकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. त्यानंतर योगाभ्यासाला सुरुवात झाली.
यावेळी श्री. शेखर बांदेकर यांनी शिबिराचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.
हिरकणी, महालक्ष्मी, वटसावित्री, एकमुखी दत्तमंदिर व वाटवे हॉल या फिटनेस योग फाऊंडेशनच्या 5 योगवर्गांतील योगशिक्षक व साधक या शिबिरात सहभागी झाले होते.
या शिबिराचा लाभ अधिकाधिक योगाभ्यास प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल लातये सर यांनी केले, प्रस्तावना सौ. रसिका सावंत यांनी मांडली तर आभार श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी मानले.
