पावसाळा संपेपर्यंत स्टॉल हटवू नका

तहसीलदार यांच्याकडे ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी बाजारपेठेत नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल पावसाळा संपतोपर्यंत हटवू नयेत अशी तोंडी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर व स्टॉल धारकांनी वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांना केली आहे.


बुधवारी नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांनी वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांच्याकडे लेखी निवेदन देऊन वैभववाडीत शहरात नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल तात्काळ हटवावे अशी मागणी केली होती.
याच दरम्यान गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका अक्षता जैतापकर व काही स्टॉल धारकांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन तहसीलदार दिप्ती देसाई यांची भेट घेऊन पावसाचे दिवस असल्याने पाऊस संपतो पर्यंत नव्याने उभारण्यात आलेली स्टॉल हटवू नयेत अशी तोंडी मागणी केली यावेळी स्टॉल धारक सौ पाटील, धोंडीराम गुरखे,हटकर आदी स्टॉल धारक उपस्थित होते.

You cannot copy content of this page