सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीवरून शिक्षणमंत्री केसरकर यांचा टोला
⚡सावंतवाडी ता.१६-: उद्धव ठाकरेंनी काल सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांना भेट दिली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुधारणा झाली, असा टोला शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे लगवाला. दरम्यान या आदी उद्धव ठाकरें हे कधीच पदाधिकाऱ्यांना भेटायला वेळ देत नव्हते.
परंतु आता आलेली परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे भेट देतात म्हणजे खरच सुधाराणा झाली असे केसरकर म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी केसरकर बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरें यांनी मुख्यमंत्री असताना कबुलायतदार प्रश्न सोडविण्याची मी वारंवार विंनती करून देखील ते तो प्रश्न सोडू शकले नाय तर ते मुख्यमंत्री असून काय फायदा होते असा सावल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
