Headlines

अंबाजी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

लायन्स क्लब ऑफ मालवणचा शैक्षणिक उपक्रम

मालवण | प्रतिनिधी :
लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने वायरी-मालवण येथील अंबाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना मिळाला.

लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच सेवाभावी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत अंबाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच वही, पेन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, दिक्षा गांवकर, मिताली मोंडकर, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर, विश्वास गांवकर, चौकेकर सर, खोत मॅडम यांच्यासह शिक्षक, लायन्स क्लबचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी, दातृत्व आणि सेवाभावाची परंपरा जपत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचा क्लबचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

फोटो : लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने वायरी मालवण येथील अंबाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

You cannot copy content of this page