मालवणात साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याची मोहीम

⚡मालवण ता.१५-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात पाणी साचून डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात आली. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. हेच पाणी डासांना अंडी घालण्यास पोषक ठरते. त्यामुळे पावसाळ्यात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मालवण शहरात डासांची समस्या मोठी आहे. त्या अनुषंगाने मालवण ग्रामीण रुग्णालया मार्फत शहरातील कायम व हंगामी डास उत्पत्तीची स्थाने, डबकी, वापर नसलेल्या विहिरी, बांधकाम चेंबर यासह ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहते अशा ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी आरोग्य सहाय्यक बी. आर. कोरडे, हत्तीरोग रात्रचिकित्सालय मालवणचे आरोग्य कर्मचारी श्री. एस. ए. चांदोस्कर, मालवण शहर आरोग्य कर्मचारी श्री. हेमंत सावजी, आरोग्य सेविका सुविधा प्रभू, साजूबाई वेंगुर्लेकर, नगरपालिका सफाई कर्मचारी श्री. कासले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page