ओझर विद्यामंदिरच्या भूमिका कोचरेकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

⚡मालवण ता.१५-: सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. भूमिका सदानंद कोचरेकर हिला गुणवत्ता यादीत स्थान मिळून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

याच वर्षी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) या परीक्षेत भूमिका कोचरेकर हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळवली होती. एकाच वर्षात दोन शिष्यवृत्ती मिळवणारी ती ओझर शाळेच्या इतिहासातील पहिलीच विद्यार्थीनी बनली आहे. तिच्या या यशाबद्दल आणि ओझर विद्यामंदिरच्या नावलौकिकात भर घातल्या बद्दल संस्था, शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्वांनी भूमिका हिचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page