महेश मांजरेकर यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.१५-: आदर्श सरपंच म्हणून नावलौकिक मिळविलेले, बॅकवॉटर टुरिझम, मत्स्योद्योग विकास असे विविध उपक्रम राबविणारे हडी गावचे माजी सरपंच महेश मांजरेकर यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

हडी गावच्या विकासाकरिता राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना गावात राबविणे तसेच आपले गाव बॅकवॉटर टूरिझम व माशांची शेती याकरिता विकसीत करण्यासाठी मांजरेकर यांनी प्रयत्न केले. ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जुलै रोजी राजा शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह (हिंदू कॉलनी, दादर पूर्व-मुंबई) येथे होणार आहे. याबद्दल मांजरेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page