प्रा. स्वागत केरकर सेट परीक्षा उत्तीर्ण…

⚡बांदा ता.१६-: प्राध्यापक तथा खेमराजचे माजी विद्यार्थी स्वागत केरकर यांनी फिजिक्स सारख्या कठिण विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल बांदा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सिंधुदुर्गातील विद्यार्थी ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होताना दिसतात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी सेट परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या प्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रा. केरकर म्हणाले की, जिवनात यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा. योग्य दिशेने वाटचाल केली तर अशक्य गोष्ट ही साध्य करू शकाल.
प्रा. केरकर सध्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. प्रा.केरकर यांनी उत्तम यश प्राप्त करून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे गौरवोद्गार प्राचार्या माधवी सावंत यांनी काढले. याप्रसंगी पर्यवेक्षक नंदकिशोर नाईक, प्रा. गंगाधर काळे, मिलन वसकर, मोहन फाटक, प्रा. सौ. सुमेधा सावळ व इतर शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page