Headlines

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांचे अर्ज रखडले

मालवणात संतप्त शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक ⚡मालवण ता.२७-: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी मालवण तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असताना अनेक अर्ज कोणतेही कारण न देता रिजेक्ट होऊन उर्वरित अर्ज मंजुरीबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मालवण तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदार वर्षा झाल्टे यांना जाब…

Read More

घरातील वीज तारा तुटल्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशांत आईर संतप्त

वीज वितरण समोर आंदोलन करण्याचा दिला इशारा घरातील वीज तारा तुटल्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशांत आईर संतप्तवीज वितरण समोर आंदोलन करण्याचा दिला इशारा

Read More

पंतप्रधान किसान समृध्दी सुविधा केंद्राच्या शुभारंभाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद…

मालवण दि प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधुन “पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा” शुभारंभ केला. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसारणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेती आवश्यक सर्व औषधे, खते, बी – बियाणे, औजारे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथून “पंतप्रधान किसान…

Read More

मामा वरेरकर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यास सुधीर मुनगंटीवार यांची सहमती…

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा:४.१० कोटी खर्चाचे बनविलेय अंदाजपत्रक.. मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेल्या येथील मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अनेकदा येथे येणाऱ्या कलाकार आणि नाट्य रसिकांची गैरसोय होते. या नाट्यगृहाची डागडुजी करण्यासाठी अनेकदा कलाकारांकडून मागणी करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता मामा वरेरकर…

Read More

शिवसेनेच्या वतीने आज कळसुलकर प्रशालेत ८९ मुलांना पुस्तके वाटप…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:रूपेश राऊळ यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२७-: शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज येथील कळसुलकर प्रशालेत ८९ मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली.शाळा सुरू होऊन 22 दिवस झाले तरी कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना पुस्तके नाहीत. त्यामुळे केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले….

Read More

चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऊर्जा व पर्यावरण समितीच्या सदस्यपदी संजय वराडकर

⚡मालवण ता.२७-: उद्योग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्र्टी अँड ऍग्रीकल्चर (MACCIA) या संस्थेच्या ऊर्जा व पर्यावरण या दोन समित्यांमध्ये मालवण मधील श्री. संजय वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संजय वराडकर यांना दिले आहे. या नियुक्ती…

Read More

मालवणात २९ रोजी मोहरम निमित्त ताजिया मिरवणूक

⚡मालवण ता.२७-: मालवणात शिवकालीन परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या मोहरम सणाला ऐतिहासिक महत्व असून यावर्षीही दि. २९ जुलै रोजी मोहरम निमित्त ताजिया मिरवणूक काढण्यात येणार आहे. मालवण मेढा येथील हजरत नसूरुद्दीन शाह कादरी यांची दरगाह आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे दरवर्षी मोहरम सण साजरा होतो. यानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग मध्ये सजविण्यात आलेला ताजिया समुद्र मार्गे मेढा येथील दरगाह मध्ये…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्यानंत तांबोळी ग्रामपंचायतमध्ये विज अधिकाऱ्यांची धाव…

समस्या मार्गी लावण्याचे सरपंचांना आश्वासन बांदा/प्रतिनिधीवीज समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबुळीवासियांनी सरपंच वेदिका नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांदा महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कार्यालयातून गायब झालेले सहाय्यक अभियंता अनिल यादव हे तांबुळी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झालेत. येत्या चार दिवसात गावातील सर्व विजेच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गेले महिनाभर विजेच्या समस्यांनी त्रस्त…

Read More

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यूदेह सापडला…

कर्ली नदीतील घटना: गुरे चारायला गेले असतांना गेले वाहून कुडाळ ता२७-: कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील  तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला.त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले, वडील असा परिवार आहे.          शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम राऊळ हे दरदिवशी प्रमाणे सकाळीच आपली गुरे घेऊन शिवापूर…

Read More

आडाळी शाळेत ‘ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ उपक्रम

⚡दोडामार्ग,ता.२७-:‘ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ हा कार्यक्रम नुकताच आडाळी प्राथमिक शाळेत घेण्यात आला. विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख होऊन दैनंदिन आहारात त्यांचा वापर वाढविण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. आडाळी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सपन्न झाला.सरपंच पराग गांवकर यांनी ‘ ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ संकल्पना स्पष्ट केली.ते म्हणाले ‘ जुन्या…

Read More
You cannot copy content of this page