Headlines

मालवण तालुका क्रीडा समन्वयकपदी श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांची सर्वानुमते निवड

मालवण दि प्रतिनिधी

मालवण तालुका क्रीडा समन्वयक निवडीसाठी पंचायत समिती, मालवण येथे क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वराडकर हायस्कूल, कट्टा येथील क्रीडा शिक्षक श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांची मालवण तालुका क्रीडा समन्वयकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मार्क धर्माई, तालुका क्रीडा अधिकारी श्री. बाजीराव देसाई, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती शीतल शिंदे, पंचायत समिती मालवणचे उपसभापती श्री. झाड, पंचायत समिती सदस्य श्री. दीपक चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बैठकीमध्ये श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आगामी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत नियोजन करण्यात आले. तालुका क्रीडा अधिकारी श्री. बाजीराव देसाई यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन, विद्यार्थी नोंदणी तसेच प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या बैठकीस मालवण तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री. झाड, पंचायत समिती सदस्य श्री. दीपक चव्हाण, श्री. डी. डी. सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांच्या निवडीबद्दल क्रीडा शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. महेंद्र वारंग यांनी उपस्थित सर्व मान्यवर, क्रीडा अधिकारी व उपस्थित सर्वांचे आभार मानले

You cannot copy content of this page