आंदोलनाच्या इशाऱ्यानंत तांबोळी ग्रामपंचायतमध्ये विज अधिकाऱ्यांची धाव…

समस्या मार्गी लावण्याचे सरपंचांना आश्वासन

बांदा/प्रतिनिधी
वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबुळीवासियांनी सरपंच वेदिका नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांदा महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कार्यालयातून गायब झालेले सहाय्यक अभियंता अनिल यादव हे तांबुळी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झालेत. येत्या चार दिवसात गावातील सर्व विजेच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


गेले महिनाभर विजेच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबुळी वासियांनी चार दिवसांपूर्वी बांदा येथे वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले. यावेळी अभियंता यादव गायब झाल्याने सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. येत्या चार दिवसात गावातील समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सरपंच वेदिका नाईक व ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज अभियंता यादव यांनी तांबुळी गाठत विजेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी देखील त्यांना ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावातील विजेच्या सर्व समस्या येत्या चार दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

You cannot copy content of this page