मालवणात २९ रोजी मोहरम निमित्त ताजिया मिरवणूक

⚡मालवण ता.२७-: मालवणात शिवकालीन परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या मोहरम सणाला ऐतिहासिक महत्व असून यावर्षीही दि. २९ जुलै रोजी मोहरम निमित्त ताजिया मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मालवण मेढा येथील हजरत नसूरुद्दीन शाह कादरी यांची दरगाह आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे दरवर्षी मोहरम सण साजरा होतो. यानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग मध्ये सजविण्यात आलेला ताजिया समुद्र मार्गे मेढा येथील दरगाह मध्ये भेटीसाठी आणण्यात येतो. त्यानंतर या दोन्ही ताजियाची दरगाह येथून बंदर जेटी, बाजारपेठ भरड नाका मार्गे पिंपळपार ते राजकोट पिराची भाट अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या ताजियाचे सर्वांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page