चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऊर्जा व पर्यावरण समितीच्या सदस्यपदी संजय वराडकर

⚡मालवण ता.२७-: उद्योग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्र्टी अँड ऍग्रीकल्चर (MACCIA) या संस्थेच्या ऊर्जा व पर्यावरण या दोन समित्यांमध्ये मालवण मधील श्री. संजय वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संजय वराडकर यांना दिले आहे. या नियुक्ती बद्दल वराडकर यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यावरण समिती कडून पर्यावरणीय शाश्वतता, हरित तंत्रज्ञान आणि त्यांचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याच्या मार्गाबद्दल शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी संबंधित सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि इतर भागधारकांसह सहकार्य करणे, उद्योग क्षेत्राशी निगडीत प्रश्न अथवा सुचना या समिती समोर मांडणे, त्यावर चर्चा करणे व चेंबर मार्फत त्याचा योग्य तो पाठपुरावा करणे अशा जबाबदाऱ्या सदस्य म्हणून श्री. वराडकर यांच्यावर असणार आहेत. संस्थेने दिलेली ही जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने योग्य रित्या पार पाडू, असा विश्वास संजय वराडकर यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page