उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:रूपेश राऊळ यांचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२७-: शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज येथील कळसुलकर प्रशालेत ८९ मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली.शाळा सुरू होऊन 22 दिवस झाले तरी कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना पुस्तके नाहीत. त्यामुळे केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
पुस्तके व औषधे देण्यात राजकारण काही नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे, तर गोरगरीब रूग्णांना प्राथमिक आरोग्य केन्द्रात औषधे मिळायला हवीत हा हेतू आहे ज्यांनी कोरोना काळात अवघा महाराष्ट्र सांभाळला त्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या आपदा परिस्थितीमध्ये औषधे आणि पुस्तके वाटण्याचे काम आम्ही करत आहोत
असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी कळसुबाई इंग्लिश स्कूलच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील 89 मुलांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसूझा, अनुप नाईक, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार तालुका महिला संघटक भारती कासार, आबा सावंत, योगेश नाईक, प्रशांत बुगडे, राजू शेटकर, शहर महिला संघटक श्रुतिका दळवी, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, विशाल काजरेकर माजी पंचायत समिती सदस्य मेघःशाम काजरेकर तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.
