Headlines

वेत्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी
महेश गावडे यांची निवड

वेत्ये ग्रामसभेत एक मताने निवड; सरपंच गुणाजी गावडे यांनी दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१३-: वेत्ये गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री.महेश गोपाळ गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वेत्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.दरम्यान यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

Read More

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कूलचे यश

⚡मालवण ता.१३-: युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलगे व मुली या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावत घवघवीत यश मिळविले. या दोन्ही संघांची निवड कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गमार्फत…

Read More

ग्रंथालय कर्मचारी किमान वेतनाबाबत वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

⚡मालवण ता.१३-: राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्यावतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. कुडाळ येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय येथे स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परिक्षा केंद्र ई लायब्ररीच्या उद्घाटन समारंभावेळी जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील…

Read More

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश

⚡मालवण ता.१३-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने कट्टा येथे संपन्न झालेल्या कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने चुरशीच्या सामन्यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाला नमवून मालवण तालुका स्तरावर विजय संपादन केला. या संघाची जिल्हा…

Read More

रायफल शूटिंग स्पर्धेत आदेश हाक्के द्वितीय

⚡मालवण ता.१३-: क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा रायफल शुटींग स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदेश हाक्के याने द्वितीय क्रमांक पटकावत यश मिळविले. त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदेश हाक्के याच्या या…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना गणित संबोध परीक्षेत मिळाले घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळा तर्फे ‘गणित संबोध परीक्षा’ घेण्यात आली. यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कु. अस्मी धीरज सावंत हिने ९६ गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर, कु.सायना श्रीराम अळवणी(८८), कु.भार्गवी विशाल परब(७६), कु. श्री तुषार…

Read More

नविन कुर्ली ग्रा.पं.साठी स्वतंत्र मतदान केंद्र व वॉर्ड रचना करावी

अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी ⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुक्यातील नविन कुर्ली ग्रामपंचायतसाठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करण्यात यावी अशी मागणी नविन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथाकणकवली तालुका राष्ट्रवादीअध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुक्यात नविन कुर्ली ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे. सदर ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र व…

Read More

इंडियन स्वच्छता लीगसाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

कर्णधारपदी अमोल भोगले तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर ⚡कणकवली ता.१३-: केंद्र शासन आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत कणकवली शहर सहभागी झाले आहे. कणकवली शहराच्या संघाचे नाव कणकवली नाईट रायडर्स असे असून या संघाच्या कर्णधारपदी अमोल भोगले यांची निवड करण्यात आली आहे तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची घोषणा…

Read More

कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस आयोजित फुगडी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूल प्रथम

⚡कणकवली ता.१३-:कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस, समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पांतर्गत फुगडी स्पर्धा 2023मध्ये शालेय गटातून त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण या प्रशालेच्या मुलींच्या समुहाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. लोककला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपली परंपरा जोपासण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी या स्पर्धा आयोजित करुन येथील महिलांना आणि विद्यार्थ्यांना चांगले…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघ जिल्हाध्यक्षपदी भालचंद्र मराठे

⚡कणकवली ता.१२-: जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भालचंद्र मराठे तर सचिवपदी सखाराम सपकाळ, खजिनदार मनोहर पालेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये ११ सदस्यांची निवड करण्यात आली. त्या कार्यकारिणीची बैठक झाली.ही बैठक माजी अध्यक्ष श्री ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणी मंडळाची…

Read More
You cannot copy content of this page