⚡मालवण ता.१३-: युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलगे व मुली या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावत घवघवीत यश मिळविले. या दोन्ही संघांची निवड कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गमार्फत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती सुलोचना पाटील मेमोरियल हॉलमध्ये जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात विजेतेपद मिळविलेल्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांच्या संघामध्ये लौकिक तळावडेकर, अधीश पेडणेकर, प्रज्वल नाम नाईक, योगेश परुळेकर, दीक्षांत शिवापूरकर तसेच मुलींच्या संघामध्ये आर्या दिघे, प्राची चव्हाण, वर्षा परुळेकर, दिया पराडकर
श्रेया नरे या मुलांनी भाग घेत चमकदार कामगिरी केली.
या दोन्ही संघातील खेळाडूंना मालवण तालुका टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर तसेच प्रशालेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी या यशस्वी मुलांचे कौतुक व अभिनंदन केले.
