ग्रंथालय कर्मचारी किमान वेतनाबाबत वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

⚡मालवण ता.१३-: राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्यावतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

कुडाळ येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय येथे स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परिक्षा केंद्र ई लायब्ररीच्या उद्घाटन समारंभावेळी जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यासंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी यासंदर्भातील आकडेवारी त्वरीत सादर करण्याचे निर्देश आपल्या सचिवांना दिले आहेत. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अनिल शिवडावकर, कार्यवाह महेंद्र पटेल, राजन ठाकुर, प्रसाद वाडकर, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page