रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश

⚡मालवण ता.१३-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने कट्टा येथे संपन्न झालेल्या कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने चुरशीच्या सामन्यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाला नमवून मालवण तालुका स्तरावर विजय संपादन केला. या संघाची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. तर मुलींचा संघ उपविजेता ठरला.

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी मुलांच्या विजयी संघात विघ्नेश हांडे, साईप्रसाद अटक, सागर सावंत, गौरव चव्हाण, मयुरेश परब, रितेश कुबल, रितेश परब, प्रल्हाद नाईक, प्रविण चव्हाण, विराज राणे तर मुलींच्या उपविजयी संघात निर्जंरा कांबळी, क्षितिजा खरवते, आर्या किडये, रुपाली कराडे, नियती पारकर, दीक्षा सुर्वे, रुपाली कांबळे आदींचा सहभाग होता. या संघांना विवेक निवाळे व साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शन प्रा.हसन खान,प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, हंबीरराव चौगले, सुमेधा नाईक, देवीदास हारगिले, उज्ज्वला सामंत, बाबूराव चौगुले व विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page