⚡मालवण ता.१३-: क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा रायफल शुटींग स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदेश हाक्के याने द्वितीय क्रमांक पटकावत यश मिळविले. त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आदेश हाक्के याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
