⚡कणकवली ता.१२-: जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भालचंद्र मराठे तर सचिवपदी सखाराम सपकाळ, खजिनदार मनोहर पालेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये ११ सदस्यांची निवड करण्यात आली. त्या कार्यकारिणीची बैठक झाली.ही बैठक माजी अध्यक्ष श्री ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली.
त्यामध्ये जिल्हाध्यक्ष भालचंद्र केशव मराठे, सचिव सखाराम लक्ष्मण सपकाळ, खजिनदार मनोहर रघुनाथ पालेकर, उपाध्यक्ष प्रकाश रामचंद्र सावंत, सहसचिव सौ. सुगंधा बाळकृष्ण देवरुखकर, कार्यकारणी सदस्य शांताराम गोपाळ रावराणे, शरद महादेव कांबळी, चंद्रकांत लक्ष्मण खडपकर, प्रकाश सुरबा राऊळ, वामन कृष्णा ताम्हणकर, प्रकाश लक्ष्मण जैतापकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी व सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
