⚡कणकवली ता.१३-:
कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस, समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पांतर्गत फुगडी स्पर्धा 2023मध्ये शालेय गटातून त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण या प्रशालेच्या मुलींच्या समुहाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
लोककला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपली परंपरा जोपासण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी या स्पर्धा आयोजित करुन येथील महिलांना आणि विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिले असे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी आयोजक कृषि विज्ञान केंद्र उपाध्यक्ष प्रदीप सावंत, प्रमुख अधिकारी भास्कर काजरेकर यांना धन्यवाद दिले.
फुगडी ग्रुपच्या सर्व मुली त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती प्रणिता गांवकर, श्रीमती सानिका बाक्रे, ढोलकीवादक शामसुंदर गांवकर, सहायक महेश तांबे यांचे सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक वामन तर्फे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.
