इंडियन स्वच्छता लीगसाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

कर्णधारपदी अमोल भोगले तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर

⚡कणकवली ता.१३-: केंद्र शासन आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत कणकवली शहर सहभागी झाले आहे. कणकवली शहराच्या संघाचे नाव कणकवली नाईट रायडर्स असे असून या संघाच्या कर्णधारपदी अमोल भोगले यांची निवड करण्यात आली आहे तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची घोषणा मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केली.

           केंद्र शासन कडून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरामध्ये इंडियन स्वच्छता लीग 2.0 हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी आपल्या स्वच्छ आणि सुंदर कणकवलीला केंद्र स्तरावर यशस्वी करण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक पर्यत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पटवर्धन चौक येथे स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाटय सादर करण्यात येईल. यानंतर कणकवली बस डेपो व आंबेडकर भवन येथे स्वच्छता मोहिमे घेण्यात येणार असून शहरातील सर्व नागरीकानी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायतकडून करण्यात येत आहे.
You cannot copy content of this page