Headlines

‘पीएम किसान’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ वंचित लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा…..

श्री. स्वप्नील रावळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६०० + प्रकरणे प्रलंबित….

⚡वेंगुर्ला ता.१०-: ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत वंचित पात्र लाभार्थी शेतक‌यांना त्वरित लाभ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी
कृषी कल्याण गट वेंगुर्ला यांच्यामार्फत शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत शासनाकडे कृषी कल्याण गट वेंगुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील रावळ यांनी सोमवारी निवेदन दिले आहे. यावेळी सुधाकर गावडे, वासुदेव गावडे, विठ्ठल पालव, हरेष पालव, शाम कोले, पेदृ रॉड्रिक्स, सुशिल परब, रूपेश परब, संजय किनळेकर, सुनिल परब आदी उपस्थित होते. केंद्र शासनाने दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासून पी.एम. किमान योजना ही शेतकरी कुटुंबांना निधित उत्पन्न देणारी व थोडासा आर्थिक हातभार लावण्यासाठी योजना चालू केली. या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाना प्रती वर्ष ६,००० रुपये अशी समान वार्षिक तीन हप्यात बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर त्यानंतर राज्य शासनाने सुद्धा ‘नमो शेतकरी महामन्मान निधी’ ही योजना चालू केली.
मागील चार वर्षापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी कुटुंबाना शोधता न येणार लाभार्थी म्हणून अपात्र ठरविण्यात आले व त्यांचे सर्व लाभ तात्काळ प्रभावाने ‘गोठवण्यात’ आले. सर्वसाधारण बहुतांशी शेतकरी कुटुंबाचे लाभ हे दि. ३१ मे २०२२ पासून बंद करण्यात आले.
लाभ पुनर्प्राप्तीसाठी वंचित लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज केले व पाठपुरावाही केला.वारंवार निवेदनाद्वारे शासनाचे जिल्हास्तरावर लक्ष वेधूनही त्याची दखल शासनस्तरावर घेतली गेली नाही. वेंगुर्लात Revoke Active झालेले पण अद्यापही एकही हप्ता न प्राप्त झालेले २९ शेतकरी बांधव असून व Revoke न झालेल्या पात्र लाभार्थ्यांची संख्या ११० आहे, तर जिल्ह्यात ६०० + प्रकरणे प्रलंबित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वंचित पात्र लाभाथ्याँचे Revoke न झालेल्या प्रस्तावांना त्वरित Revoke करुन त्यांना मर्व लाभ पूर्ववत सुरु करावेत. Revoke Active प्रस्तावातील लाभार्थ्यांना संदर्भिय योजनांचे लाभ तात्काळ प्रदान करण्यात यावेत, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page