Headlines

कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन रस्ते होणार चकाचक

रस्ता व सुशोभीकरणाच्या कामांचा 8 ऑगस्टला शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या चार रेल्वे स्थानकाना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याच्या कामांचा मार्चच्या अर्थसंकल्पमध्ये समावेश करण्यात आला आहे. या कामांचा ऑनलाईन शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी 8…

Read More

सिंधुदुर्गनगरीच्या कृषी कन्या पडवे गावात दाखल

⚡ओरोस ता.०७-: छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरीमधील बीएससी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये गायत्री कुऱ्हे, साक्षी बांदल, रितू गावडे, प्रणाली सावंत, राजेश्वरी राऊत या विद्यार्थिनींचा समावेश आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२३-२४ या वर्षा करिता पडवे येथे या विद्यार्थिनी ऑगस्ट ते डिसेंबर…

Read More

पवनचक्की येथील झीप लाईन बंद करा…

संदीप पांडवर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ओरोस ता ७-:देवगड पवनचक्कीच्या दहा मीटर अंतरावर बसविण्यात आलेल्या झीप लाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या तारेची कोणतीही टेस्टिंग करण्यात आलेली नाही. साध्या प्रकारची, कमी दर्जाची, कमी जाडीची, लवकर गंजणारी तार आहे. त्यामुळे या तारेवरून सोडण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ही झीप लाईन ताबडतोप बंद…

Read More

वेंगुर्ले येथे उद्यापासून आमचा गाव, आमचा विकास प्रशिक्षण…

ओरोस ता.०६-:आमचं गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बाबत जिल्हास्तर प्रशिक्षण कार्यक्रम वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. ही शिबिरे एक दिवसीय व निवासी आहेत. याचा शुभारंभ ८ ऑगस्ट पासून होणार असल्याची माहिती ग्राम पंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली आहे.

Read More

सिंधुदुर्गातील अवैध धंद्याविरोधात
विरोधात शिवसेना आक्रमक

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी वेधले पोलीस अधीक्षकांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तात्काळ पूर्णतः बंद करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावी, नाही तर आम्हाला आमच्या मार्गाने दाद मागावी लागेल. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, माजी जि. प….

Read More

कलमठ गावडेवाडी शाळेत जडीबुटीदिन साजरा

⚡कणकवली ता.०७-: जि.प.प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे महिला पतंजली योग समिती कणकवली तर्फे जडीबुटीदिनानिमित्त औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले .जडीबुटीदिन विविध उपक्रमांनीसाजरा करण्यात आला. डाॅ.वैशाली कोरगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली.जड आणि बुटी यांचा संबंध स्पष्ट करताना आपल्या जीवनातील त्यांचे महत्व विशद केले.योगाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे सांगितले.सौ.समिधा वारंग यांनी नेहमीच्या वापरातल्या तुळस,अडुळसा,यांचे…

Read More

मुक्ताई ॲकेडमीचे कार्य कौतुकास्पद…

देव्या सुर्याजी:बावन्न मुलांनी स्पर्धेत घेतला सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.०७-: मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.6 ऑगस्ट रोजी कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.दुर्गेश ऊर्फ देव्या रमेश सुर्याजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी…

Read More

मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधीहुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५०० विद्यार्थी- विद्यार्थीनींकडून हुतात्मा मेजर कौसतुभ रावराणे यांच्या परिवारास ५०० पत्र पाठवण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

शहरातील भटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची सांगेलकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे बुजविले…

⚡सावंतवाडी ता.०६-: खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी आणल्याची वल्गना करणाऱ्या सत्ताधार्या ना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्याची दुरूस्ती करून एकप्रकारे चपराक दिली आहे. सावंतवाडी शहरातील विविध रस्त्यांना पडलेले खड्डे नगरपरिषद प्रशासनाने बुजवलेले नसल्यामुळे या खड्ड्या मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत सावंतवाडी शहरातील भटवाडी ते कोलगाव निरूखेवाडी पर्यंत…

Read More

शहरातील भटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची सांगेलकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे बुजविले…

⚡सावंतवाडी ता.०६-: खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी आणल्याची वल्गना करणाऱ्या सत्ताधार्या ना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्याची दुरूस्ती करून एकप्रकारे चपराक दिली आहे. सावंतवाडी शहरातील विविध रस्त्यांना पडलेले खड्डे नगरपरिषद प्रशासनाने बुजवलेले नसल्यामुळे या खड्ड्या मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत सावंतवाडी शहरातील भटवाडी ते कोलगाव निरूखेवाडी पर्यंत…

Read More
You cannot copy content of this page