वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.१७-: जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे १४ सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये कासार्डे ज्युनिअर कॉलेजचा वेदांत विनायक वायंगणकर याने यश संपादन केले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वेदांत वायंगणकर याने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात खेळताना जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक पटकाविला. या खेळाडूंना प्रा. विनायक पाताडे, अवधुत कानकेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेत तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम. डी. खाइये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व ज्येष्ठ शिक्षिका बी. बी. बिसुरे यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page