कमी वीजदाबाच्या समस्येतून ग्रामस्थांची होणार सुटका; मनीष दळवी यांच्या हस्ते लोकार्पण..
⚡बांदा ता.२९-: बांदा खालची सटमटवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उत्साहात झाला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले.
खालची सटमटवाडी परिसरात गेल्या काही काळापासून कमी वीजदाबाची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे घरगुती वीज उपकरणे तसेच दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता. परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, कमी वीजदाबाच्या समस्येतून ग्रामस्थांची सुटका होणार आहे.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा शहर अध्यक्ष निलेश नाटेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विकी कदम, बांदा युवा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, बांदा भाजप महिला मंडल अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, माजी सरपंच अशोक सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, माजी शहर अध्यक्ष बाबा काणेकर, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर, ‘मन की बात’ बांदा प्रमुख सिद्धेश महाजन, गुरूनाथ सावंत, वाफोली उपसरपंच विनेष गवस, शिवानंद भिडे, अक्षय परब, तातो परब, दाजी परब, दशरथ परब, दर्पण परब, तुषार परब, वैजयंती परब, अवनी परब, शंकर परब, विलास परब, राजू परब, सुभाष परब, शुभम परब, महेश शिरोडकर, रजत शिरोडकर, सूर्यकांत शिरोडकर, सुनील सावंत, प्रथमेश परब, शिल्पा परब, अमोल परब, अपूर्वा परब, चारूशीला परब, सहदेव परब, दया दळवी, राजन गडकरी, गुरु गडकरी, मंदार कुडव, आपा गडकरी, जिवबा वीर, बाबी वसकर, चंद्रकांत परब, सुहास आरोस्कर, ओमकार परब, रमेश परब, पुरोहित हेमंत धुपकर, शुभम साळगावकर, गुरूनाथ उर्फ दादा साळगावकर, सर्वेश मुळ्ये आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा खालची सटमटवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर व ग्रामस्थ.

