Headlines

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत कणकवलीत शिबिर…

विविध प्रमाणपत्रांचे वितरण; लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी..

⚡सिंधुदुर्ग, दि. २९-: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष मोहिमेअंतर्गत कणकवली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच आधारकार्ड, आरोग्यविषयक सेवा व आरोग्य तपासणीचा लाभ देण्यात आला.
इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी कणकवली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरास कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे तसेच कणकवली महाविद्यालयाचे प्रा. हरीभाऊ भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रे तहसीलदार दिक्षांत देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. तसेच अनेक लाभार्थ्यांना आधारकार्ड उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य विभागामार्फत विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून शिबिरातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना शिबिराचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांची माहिती घेऊन त्यावर शासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे यांनी विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
००००००००

You cannot copy content of this page