Headlines

जीवनदीप योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ…

IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; रुपये १४९ पासून विमा संरक्षण..

⚡सिंधुदुर्ग,ता.२९-: गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva Bupa Health Insurance यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ लाख, ३ लाख आणि ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण पर्याय उपलब्ध असून, करासहित प्रीमियम रुपये १४९ पासून सुरू होतो.
ग्राहकांच्या गरजेनुसार विविध विमा संरक्षण पर्याय निवडता येतात. योजनेच्या पर्याय क्रमांक २ मध्ये गंभीर आजाराच्या परिस्थितीत दरमहा रुपये २५ हजारांपर्यंत उत्पन्न सुरक्षा उपलब्ध असून, ही सुविधा कमाल तीन महिन्यांपर्यंत लागू आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च तसेच आजारपणामुळे उत्पन्नात निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या काळात आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्य विम्याचे महत्त्व जाणून घेऊन उपलब्ध योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग डाक विभागाचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.
००००००

You cannot copy content of this page