⚡सावंतवाडी ता.१७-: मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालक न्यायमूर्ती श्री.नितीन बोरकर हे जुडीशियल वर्कशॉप करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांची जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं.
सदर प्रसंगी जिल्हा प्राधान न्यायाधीश श्री. संजय भारूका ,जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी उपाध्यक्ष तथा विध्यमान सदस्य अँड. संग्राम देसाई,सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अँड परिमल नाईक, सचिव अँड. यतिश खानोलकर, उपाध्यक्ष अँड. नीलिमा गावडे, खजिनदार अँड. गोविंद बांदेकर, सदस्य अँड. संदीप निबाळकर आदी वकील संघटना पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील कुडाळ, देवगड, सावंतवाडी, मालवण येथील न्यायालयीन इमारतीचे प्रश्न तातडीने सोडविण्या विषयी, ई फायलिंग विषयी तसेच कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
