गणपतीची आरास करत असताना शॉक लागून सरमळे येथील रमाकांत परब यांचे निधन …

⚡बांदा ता.१८-:
    गणपतीची आरास करत असताना शॉक लागून सरमळे देऊळवाडी येथील रमाकांत शिवराम परब (वय ५०) यांचे निधन झाले. ही घटना आज सकाळी ९ वाजता घडली.

रमाकांत हे घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर चढून ते वायरिंग करत होते. त्यावेळी शॉक लागल्याने ते तोल जाऊन खाली जमिनीवर पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page