एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक…

कसाल येथील घटना:दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

ओरोस ता १७
मालकाच्या समोरच त्याचे ए टी एम कार्ड वेळोवेळी मशीनमध्ये टाकून येणारे पैसे बोटाच्या साहाय्याने अडवून ठेवत ४९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार कसाल येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ए टी एम कार्डमध्ये घडला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्ती विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन सीताराम सावंत, वय 56 वर्ष, व्यवसाय- नोकरी, शिक्षण-बी.कॉम. रा- कोलगाव भोमवाडी ता- सावंतवाडी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या कसाल येथील ए टी एम मशिन कक्षात हा प्रकार घडला आहे. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजताचे मुदतीत हा गुन्हा घडला आहे. गुन्हा दाखल असलेल्या दोन अनोळखी व अज्ञात इसमानी वेगवेगळ्या वेळेत ए टी एम सेंटरमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडील कार्डमधून वेगवेगळ्या रकमा विड्रो करताना, कॅमेऱ्यात अर्धवट टिपला जाईल अशी दक्षता घेत एटीएम मशीन मधून व्यवहाराची रक्कम बाहेर येणाऱ्या कप्प्यात, एटीएम मशीन मधून केलेल्या रक्कमेचे ट्रांजेक्शन सिस्टममध्ये नोंद होऊ नये या उद्देशाने पैसे एटीएम मधून बाहेर पडण्यापूर्वी हाताचे बोटांचे साहाय्याने अडथळा निर्माण करून वेळोवेळी 49 हजार 500 रुपये इतकी रक्कम गैरप्रकारे काढून घेऊन बँकेची फसवणूक केली. या ट्रांजेक्शन द्वारे आर्थिक फसवणूक झाल्याचे बँकेच्या तपासणी टीम कडून समजून आल्याने फसवणूक झालेल्या नितीन सीताराम सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्‍हटकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम हे करीत आहेत.

You cannot copy content of this page