Headlines

क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठीक्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा…

⚡सिंधुदुर्ग, दि. २९-: क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक क्रीडा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ (Krida e-Pramaan) प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र खेळाडूंनी या प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदणी करून क्रीडा प्रमाणपत्रासाठी विनंती करता येणार आहे.
क्रीडा ई-प्रमाण प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी https://kridaepramaan.org/register या लिंकचा वापर करता येईल. तसेच क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन मुख्य पृष्ठावरील ‘माझ्या सेवा’ या पर्यायामधून ‘५ टक्के आरक्षण’ ही सेवा निवडून नोंदणी करता येईल.
नोंदणीसाठी ‘Register here’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी. त्यानंतर नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी. ई-मेलवर प्राप्त Credentials च्या आधारे लॉगिन करून, आवश्यक असल्यास पासवर्ड Reset करावा.
प्रमाणपत्रासाठी विनंती करण्यासाठी लॉगिन केल्यानंतर ‘Request Certificate’ या विभागात जाऊन संबंधित स्पर्धेविषयीची संपूर्ण व अचूक माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत.
नोंदणी करताना नाव, जन्मतारीख, ई-मेल व मोबाईल क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. OTP पडताळणीसाठी नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांक उपलब्ध ठेवावा. प्रमाणपत्रासाठी सादर केलेली माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट, पूर्ण व अधिकृत असावीत.

00000

You cannot copy content of this page