⚡बांदा ता.२९-: कास-दाभाळवाडी येथील रहिवासी तथा बांदा येथील बांदेश्वर टॅक्सी चालक-मालक संघटनेचे खजिनदार संदीप बाबू भाईप (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले.
संदीप भाईप हे टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून बांदा परिसरात कार्यरत होते. तसेच त्यांचा टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कास तसेच बांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो:-
पासपोर्ट

